मुलां मुलींमधील सुप्त गुण ओळखायला हवेत: भुजबळ

11
0
Share:

Breaking News | Ahmednagar: प्रत्येक मुलात काही तरी सुप्त गुण लपलेले असतात. त्यामुळे शिक्षक पालकांनी ते सुप्त गुण ओळखून त्यांच्यातील राजहंस ओळखला पाहिजे.

latent qualities in girls

पारनेर: शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकीज्ञान किंवा चौकटीत शिक्षण नसून मुलांचा सर्वांगीण विकास आहे. प्रत्येक मुलात काही तरी सुप्त गुण लपलेले असतात. त्यामुळे शिक्षक पालकांनी ते सुप्त गुण ओळखून त्यांच्यातील राजहंस ओळखला पाहिजे, असे आवाहन प्राचार्य अर्जुन भुजबळ यांनी केले.

पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक-शिक्षक मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. प्राचार्य भुजबळ, मनीषा गाडगे, निर्मला सोबले, बापूराव होळकर, जयवंत पुजारी, पालक यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी शालेय गुणवत्तेच्या अहवालाचे वाचन केले. क्रीडा शिक्षक बापूराव होळकर यांनी क्रीडा अहवाल वाचन केले. शिक्षिका शर्मिला मगर, प्रमोद कोल्हे, सत्यम निमसे, नितीन औटी, संतोष कार्ले, सुभाष मते, बापूराव झांबरे, व्यंकटेश कुलकर्णी, सविता जगदाळे, सतीश म्हस्के आदींनी मनोगत व्यक्त केले. पालकांनी उपस्थितीत केलेल्या विविध प्रश्नांना प्राचार्य भुजबळ, बापूराव होळकर, संतोष पारधी, सुजाता गुंड, रिमा भिंगारदिवे, कीर्ती कुसकर, नीलेश पाचर्णे, मनोहर रोकडे, दिनेश आंबेकर, वैशाली सालके, कल्पना नरसाळे, सुरेखा थोरात, वंदना थोरात, संगीता सोनवणे, स्वाती म्हस्के, संदीप पांढरे, सूरज घोडके यांनी उत्तरे दिली.

Web Title: Boys should recognize latent qualities in girls

Share:

Leave a reply

error: Content is protected !!