सभेत रंगला शिवदुर्गेचा पुरस्कार सोहळा

11
0
Share:

Breaking News | Ahmednagar: संस्थेच्या वतीने गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या शिवदुर्गच्या मावळ्यांनी सह्याद्रीतील ५० गडकोटांची भ्रमंती पूर्ण.

Shivdurga's award ceremony was held in the meeting

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनची संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली घारगाव (ता. श्रीगोंदा) येथे झाली. आमदार बबनराव पाचपुते, राजेश इंगळे, शिवदुर्गचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर यांच्या हस्ते विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

संस्थेच्या वतीने गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या शिवदुर्गच्या मावळ्यांनी सह्याद्रीतील ५० गडकोटांची भ्रमंती पूर्ण केले. अशा अकरा सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय शिवदुर्ग आदर्श मावळा पुरस्कार अक्षय तुषार, सुनील चौधरी, अमोल झुंबरराव बडे, रहीम उस्मान हवालदार, अक्षय सुनील ओहळ, अजित अंबादास लांडगे, आदर्श महिला रणरागिणी राज्यस्तरीय पुरस्कार तनिष्का कळमकर, वैशाली गायकवाड, विजया लंके, सुचित्रा दळवी, तारा चांदगुडे, शिवदुर्ग स्नेहबंध सन्मान दत्ताजी शिंदे, बेलवंडी शिलालेख वीरश्री सन्मान अनिल किसन दुधाणे, वारसा प्रेरणा सन्मान शास्त्रज्ञ अशोक रूपनेर, राजेश इंगळे यांनी संस्था उपक्रम वाढीसाठी व समाजात चांगला विचार देण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी बबनराव पाचपुते, जिल्हा सैनिक संघटनेचे अध्यक्ष संदीप सांगळे, श्रीगोंदा शहर संघटनेचे अध्यक्ष नवनाथ खामकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक डॉ. चंद्रशेखर कळमकर यांनी केले. सूत्रसंचालन मारुती वागसकर, भरत खोमणे यांनी केले. सचिव सोमेश शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Shivdurga’s award ceremony was held in the meeting

Share:

Leave a reply

error: Content is protected !!