अहमदनगर: आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

12
0
Share:

Breaking News | Ahmednagar: १२० गुन्हेगारांना शहर प्रवेशबंदी केल्याचा आदेश प्रांतअधिकारी.

Offense for breach of order

अहमदनगर : गणेश विसर्जन कालावधीत भिंगार कॅम्प हद्दीत सार्वजनिक शांतता, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी १५ ते १७ ऑगस्टदरम्यान १२० गुन्हेगारांना शहर प्रवेशबंदी केल्याचा आदेश प्रांतअधिकारी सुधीर पाटील यांनी जारी केला आहे.

रविवारी सकाळी साडेअकरा वाजता भिंगार शहरात अंतिम चौक येथे चेतन भागूजी शहापूरकर (रा. भिंगार) हा हद्द बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध भिंगारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर, सहायक पोलिस उपनिरीक्षक रेवणनाथ दहीफळे, हवालदार अजय गव्हाणे, दीपक शिंदे, संदीप घोडके, अमोल आव्हाड, समीर शेख यांनी केली आहे.

Web Title: Offense for breach of order

Share:

Leave a reply

error: Content is protected !!